अमळनेर प्रतिनिधी शहरातील चौधरी वाडा भागातील ९२ वर्षाचे आजोबा व शिव कॉलनीतील ७६ वर्षीय आजोबांनी आज कोरोनावर मात करित बरे होवून घरी आले आहेत कोरोनाचे रूग्ण संख्या व मृत्यूची संख्या वाढत असली तरी कोरोनामूक्त होणारे देखील बऱ्या पैकी असल्याने समाधानाची बाब आहे माळी वाडा परिसरातील चौधरी वाडा येथील ९२ वर्षीय वृध्द यांनीं कोरोनावर विजय मिळवला म्हणून त्यांचे पुष्पवृष्टी करून प्रभागातील नागरीक व नगरसेविका सौ.रत्नमाला महाजन ,श्री.साखरलाल महाजन सर , रघुनाथ सुकदेव महाजन व मालुबाई व नवसाताई, सुमनताई,सुनंदाबाई, रंजनाबाई,संगीताताई आशाबाई,रत्नाताई,आबाजी,प्रकाशआप्पा,सुहासबापू,रघुनाना ,विशाल,समाधान,योगेश तुषार व मित्र परिवार ऊपस्थीत होते १० जून रोजी अमळनेर येथे कोविड सेंटरला त्यांना दाखल करण्यात आले होते११ जून रोजी जळगांव येथे दवाखान्यात दाखल केले व त्यांचा नातू तुषार याने त्यांची विशेष काळजी घेतली तर शिव कॉलनीतील ७६ वर्षीय रहिवासी आजोबा १५ दिवसांपूर्वि पॉझीटीव आले होते त्यांचेवर चोपडा ऊप जिल्हा रूग्णालयात ऊपचार सुरू होते ते देखील कोरोनारवर मात करित ऊपचार घेवून घरी परतले त्यांचे परिसरातील नागरीकांनी टाळ्या वाजवून व फूलांचा वर्षाव करित स्वागत केले यावेळी परिवारातील सदस्य व नागरीक ऊपस्थीत होते
