Halloween party ideas 2015

टि- २० सामन्यात एका षटकातील तुफान टोलेबाजी
टि-२० क्रिकेट म्हटले की सर्वांना फलंदाजांने गोलंदाजाची केलेली यथेच्छ धुलाई स्वर्गसुखाचा आनंद देऊन जाते. एव्हाना प्रेक्षक अशीच कत्लेआम फलंदाजी बघण्यासाठीच सामना पहायला जातात. फलंदाजाला एकदा का गोलंदाजाचा अंदाज आला मग तो त्याची हयगय करत नाही. भले मग तो गोलंदाज कोणीही असो.
टि-२० खेळच मुळी फटकेबाज फलंदाजांचा आहे. या खेळाच्या वाढत्या लोकप्रियते बरोबरच फलंदाजांनी अनेक नवनवीन फटकेही शोधून काढले. मग त्याचे गुण उधळत बिचाऱ्या गोलंदाजांची सालटं काढण्यात काय मजा येत असेल ते तो फलंदाज व प्रेक्षकच जाणो ! मात्र गोलंदाजांच्या अब्रूचे लक्तरे जगभर पसरतात हे मात्र तितकेच खरे आहे.
सदर लेखात टि-२० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धडाकेबाज फलंदाजांनी एकाच षटकात तुफान टोलेबाजी करून लुटलेल्या सर्वाधिक धावांच्या करामतीची कहाणी आपणास पेश करत आहोत.
या बेबंद फटकेबाजीच्या शानदार क्लबचा गोल्डन मेंबर आहे भारताचा युवराजसिंग. आपणास माहिती आहेच की, सन २००७ च्या पहिल्या टि -२० विश्वचषक स्पर्धेत युवराजने इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकातील सलग सहा चेंडूवर मैदानभर टोलेबाजी करत सहा गगनभरारी षटकार खेचून ३६ धावांची लगान वसूल केली होती.
सन २०२० च्या सुरुवातीलाच भारताने न्यूझिलंड दौरा केला. त्या दौऱ्यात भारताने टि-२० मालिका ५-० अशी जिंकली. त्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझिलंडच्या यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्ट व रॉस टेलर या दोघांनी मिळून भारताच्या शिवम दुबे याच्या गोलंदाजीची अशी काही मोडतोड केली की त्या नंतर तो भारताच्या संघातूनच गायब झाला. दुबेच्या त्या एका षटकात सेफर्ट-टेलर दुकलीने तब्बल ३४ धावा फटकविल्या. चार षटकार व २ चौकार व दोन नोबॉलच्या धावा अशी खिराफत दुबेने वाटली होती. हि दुसऱ्या क्रमाकांची एका षटकातील सर्वाधिक धावांची लयलूट आहे.
सन २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूध्द खेळताना आक्रमकता नसानसात भिनलेल्या इंग्लंडचा यष्टीरक्षक - फलंदाज जोस बटलरने आपल्या आक्रमक व जोरदार फटकेबाजीचा नमुना पेश केला. बटलरने द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पारनेलच्या एका षटकात ३ षटकार व २ चौकार ठोकत ३२ धावा जमविल्या होत्या. हा या क्लबमधील तिसरा मोठा हल्ला आहे.
इंग्लंडच्या टि- २० संघात एकाचढ एक आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांचा संघ टि- २० मध्येही प्रबळ भासतो. सन २०१२ मध्ये याचे एक उत्कृष्ठ उदाहरण इंग्लंड व अफगाणिस्तान यांच्यातील एका झटपट लढतीत बघायला मिळाले. अफगाणिस्तानचा गोलंदाज इझाहतुल्लाह दौलतजई याच्या एका षटकात जोस बटलर, जॉनी बॅरियस्टो व ल्युक राईट या तिघांनी मिळून ३२ धावा बदडल्या. या एका षटकातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधीक धावा आहेत.वेस्ट इंडीजच्या संघात तर स्फोटक फलंदाजांचा दारूगोळाच भरलेला असतो. कधी कोणता खेळाडू गोलंदाजांवर तुटून पडेल याचा नेम नसतो. अशीच एक अफलातून खेळी सन २०१६ मध्ये फ्लोरीडात विंडीजच्या एर्वीन लुईसने भारताविरूध्द केली होती. त्यावेळी त्याचा बकरा ठरला होता भारताचा तत्कालीन अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी. बिन्नीने त्या षटकात लुईसकडून ३२ धावांचा मार खाल्ला होता. टि- २० च्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका षटकातील हा सर्वात मोठा पाचवा हल्ला होता.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email: dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.