अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-सध्या जीवोच्या नेट ने जनता त्रस्त आहे.रिलायन्स या मोठ्या कंपनीने अगोदर जनतेला अमिश दाखवून सध्या जीवोला ग्रामीण भागात व शहरी भागातही रेंज नसल्याने सध्या जीवोने ...जनतेचा जीव घालवल्याचे चित्र पहावयास दिसत आहे.
सुरवातीला जीवोने वेगवेगळे प्लँन आणत जनता बळी पडली आज देशात सर्वात जास्त गि-हाईक जीवोचे झाले आहेत. सुरवातीला रेंज चांगली मिळत असत.प्लँन सर्वसामान्य माणसाला परवडणारे असल्याने जनता इतर कंपनी बदलून जीवोमध्ये आले. सध्या जनतेचे आगीतून पफुडयात पडल्यासारखे झाले आहे.शहरी भागातही जीवोचे नेट मंद चालते,कधीकधी फोन मधील आवाज न समजणे,यापेक्षा ग्रामीण भागात जीवोला रेंज नसल्याने नागरिकामध्ये कमालीची नाराजी आहे.याबाबत तक्रार केली असता कर्मचारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तर मिळत असतात.
रिलायन्स कंपनी हि देशातील मोठा उद्योग समुह आहे.जीवोने अधिक नेटची सवय लावून दिली. आता नेटचा स्पिड कमी असतो,399 रूपयात तिने महीनेचा पँक होता.नंतर लोकांची गरज वाढल्याने ७४ दिवस तर काहींना ८४ दिवस कालावधी असतो. त्यामुळे सध्या जनता नेटवर्क समस्यामुळे नागरिकांचा जीवोने जीव घेतला आहे.
जीवोच्या नेटवर्क बाबत चांगली सुविधा दयावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.