*नुतन पोलीसनिरीक्षक बडगुजर यांच्याकडून जनतेची माफक अपेक्षा*
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-अमळनेर शहरात महत्वाचा ठिकाणी रोडरोमिओंची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.त्यामुळे अनेक मुलीची छेड काढणे,मारहाण करणे,अव्वाच्छ शब्दात शिव्या देणे,जेष्टाचां अपमान करणे ,भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणे या गोष्टी सध्या शहरातील मुंदडा महाविद्यालय, डि.आर.कन्या शाळा,जय योगेश्वर, प्रताप काँलेज, स्वामी समर्थ मंदीर समोर,जी.एस.हायस्कूल याठिकाणी रोडरोमिओंची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.त्यामुळे मुलीमध्ये घबराट असते.यांच्यावर अमळनेरचे नुतन पोलीसनिरीक्षक अनिल बडगुजर यांनी वचक बसवून रोडरोमिओंनवर कारवाई करावी अशी माफक अपेक्षा अमळनेर येथील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
सविस्तर माहीती अशी कि अमळनेर शहरातील शाळा महाविद्यालयासमोर उनाळ मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.रहदारीचा रस्ता असला तरी ररत्यांच्या मध्ये मोटारसायकल उभी करणे,मोबाईल बोलणे,हुज्जत घालणे अशा गोष्टी नित्याच्या आहेत.असे रोडरोमिओं मोटारसायकल जोराने चालवीत असतात यांच्यावर अमळनेरचे पोलीसनिरीक्षक अनिल बडगुजर यांनी चोप दयावा व शाळा व महाविद्यालयाच्या ठिकाणी एकटे मुलींना जाणे कठिण आहे अशा रोडरोमिओंवर नुतन पोलीसनिरीक्षक बडगुजर कारवाई करतील का?विना लायसनधारकावर तरूणावर कारवाई होईल का?नुतन पोलीस निरीक्षक याच्या समोर शहराला शिस्त लावणे हे तुर्त तरी एक आवाहन आहे.अशी चर्चा अमळनेर नागरीकामध्ये सुरू आहे.