Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील अनेक वयोवृद्ध बंधू व भगीनी महसूल विभागाच्या चकरा मारतांना दिसतात. काही नागरीकाकडे कागदपत्रे अपुर्ण असतात तर कधी पैसे नसतात अशावेळी चकरामारूण थकून जातात परंतु त्याच्या समस्येची कुणी दखल घेत नाही. अशावेळी अमळनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अशा निराधार लोकांना मदतीचा हाथ दिल्याने निराधार नागरीकामध्ये समाधान व्यक्त केले जाते
       अमळनेर नगरपालीकेच्या नगराध्यक्षा व दक्षता समितीच्या सदस्या सौ पुष्पलता पाटील यांनी अन्न सुरक्षा योजना व संजय गांधी निराधार योजनेपासून अनेक महीला व पुरूष वंचीत होते त्यांनी माजी आमदार साहेबराव पाटील, व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या समोर आपल्या समस्या सांगितल्या.क्षणाचा विचार न करता त्यांचे फार्म भरून विनामूल्य प्रकरण स्वखर्चाने तहसिल कार्यालयात सादर करूण लाभार्थ्यांना लाभाचे मंजुरीपत्र खालील निराधार व्यक्तीनां वाटण्यात आली प्रेमराज सुका महाजन, बशीरखाँ नजीरखाँ पठाण, दयाराम हरी मोरे,   भास्कर बि-हाळे,प्रकाश शिंदे,आशाबाई सोनवणे, कल्पना पाटील, संजय ठाकुर, विजय ठाकरे, जगन माळी,शितल सुर्यवंशी, सुभाबाई मोरे,मनुबाई भोई, यां लाभार्थ्यांना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, समाजसेवक रविद्र पाटील, विक्रांत पाटील उपस्थित होते.नगराध्यक्षा पाटील यांच्या या निराधार व्यक्तीनां मदतीचा हाथ दिल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.