अमळनेर प्रतिनिधी- 2005 पूर्वी नियुक्त असलेल्या टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर पेन्शन संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीताताई शिंदे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अमर उपोषणास नाशिक येथील शिक्षक के.एम.के माध्यमिक विद्यालय चे कलाशिक्षक राहुल पारखे सर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या शिक्षकाला आज ना उद्या पेन्शन मिळेल या आशेने आपल्या संसाराचा रहाटगाडे कसेतरी चालवत होता .आझाद मैदानावरील चार दिवसापासून पेन्शनसाठी उपोषणास बसलेल्या शिक्षकांच्या पेंशन संदर्भात
शासन लवकर निर्णय घेत नाही. शासन अधिकृत आश्वासन देत नाही. याचा धसका हायपर टेन्शन घेऊन त्या शिक्षकांचे निधन झाले ही अत्यंत वाईट घटना घडल्याने त्यांचा परिवार आज उघडा पडला. पेन्शनसाठी एका शिक्षकाचा जीव गेला तरी शासनाला अजून जाग येत नाही .शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा . 2005 पूर्वीच्या राज्यातील सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी नाहीतर शासनाच्या हायपर टेन्शन मुळे अशा घटना घडतील याला शासन जबाबदार राहील असा प्रश्न सध्या शिक्षकामध्ये सुरू आहे.