Halloween party ideas 2015

*ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना "४६ कोटी रुपयांची थकबाकी" मिळणार*


*

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिले आदेश*


आमदार निरंजन डावखरे व भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय


मुंबई (प्रतिनिधी) ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची सातव्या वेतन आयोगाची दोन महिन्यांच्या फरक  रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेश आज शालेय शिक्षण विभागाने दिले

याबाबत *कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे व भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची आज विधी मंडळात भेट घेतली* व ठाणे-पालघर जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतरांची *७ व्या वेतन आयोगाच्या जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ ची फरक रक्कम मिळाली नसल्याची तक्रार* केली. यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टी मुंबई उपाध्यक्ष वसंतराव जाधव व भाजपा शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष सचिन पांडे हेही उपस्थित होते. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यावर अवर सचिवांनी शिक्षण संचालकांना तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आदेश देऊन वेतनाचा देय फरक असल्याने त्याला प्रशासकीय मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदेशात स्पष्ट केले असल्याने फरकाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

याबाबत डावखरे व बोरनारे यांनी १४ जून रोजी राज्याच्या शिक्षण संचालकांकडेसुद्धा वेतन फरक देण्याची मागणी केली होती. परंतू

१५ जुलै २०१७ च्या शासन निर्णयाच्या काही मुद्यांमुळे रक्कम देण्यात अडचण येत होती. जी आर मध्ये चालू आर्थिक वर्षाशिवाय मागील वर्षातील खर्चाचे प्रलंबित दावे थकीत म्हणून गणण्यात यावेअसें नमूद केले आहे. परंतू *७ व्या वेतन आयोगाची २ महिन्यातील रकमेची देयके ही नियमित वेतनाचा देय फरक असल्याने ती थकीत असल्याचे गृहीत धरून प्रशासकीय मान्यता घेण्याची आवश्यकता नाही असे आमदार निरंजन डावखरे व भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी पटवून दिल्याने प्राथमिक शिक्षकांना १२ कोटी ३० लाख तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांना ३४ कोटी ५६ लाख असे एकूण ४६ कोटी ८६ लाख रुपये वेतन देयकाचा फरक मिळणार आहे*.  


*शिक्षणमंत्र्यांचे विशेष आभार*


शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारून केवळ ४ दिवस झाले असूनही आज ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचा मोठा प्रश्न सोडविल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे अभिनंदन करून शिक्षकांच्या वतीने आभार मानले आहेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.