*आज उपोषणाचा चौथा दिवस.
*संध्याकाळी शिक्षणमंत्र्यांनच्या चर्चेत शिष्टमंडळाशी चर्चा सभागृहात विषय आज चर्चेला, उपोषण मागे घ्या -शिक्षणमंत्री आशिष शेलार.
* जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील.
संगीताताई शिंदे
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) 2005 पूर्वी नियुक्त झालेले व टप्प्याटप्प्याने अनुदान आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या चार दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर पेन्शन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पेन्शन ग्रस्त शिक्षक उपोषणाला बसले आहेत.
आतापर्यंत आझाद मैदानावरील उपोषणाला अनेक शिक्षक आमदार पदवीधर आमदार व आमदार यांनी भेटी देऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे आपल्या न्याय मागणीसाठी आम्ही सदैव आपल्या बरोबर आहोत असे सांगितले उपोषणाचा वाढता पाठिंबा पाहून काल संध्याकाळी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दखल घेऊन पेन्शन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रण दिले.
गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर मुंबई येथे पेन्शन संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीता ताई शिंदे मुलानी सर व इतर शिक्षकांच्या शिष्टमंडळासह विधान भवनात शिक्षण मंत्री नामदार अशिष शेलार यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी अनिल बोंडे , मराठवाड्याचे लढवे शिक्षक आमदार विक्रम काळे सर उपस्थित होते. पेन्शनचा प्रश्न आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे कायद्याच्या सर्व बाबी तपासून शासनाला काय निर्णय घेता येईल याबाबत मी कळवतो आज सभागृहात हा विषयावर चर्चा घडवून आणणार आहे तरी उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन शिक्षण मंत्री यांनी शिष्टमंडळाच्या पदाधिकारी यांना सांगितले.
जुन्या पेन्शन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे यांनी सांगितले की जोपर्यंत शासन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहेत असे सांगितले.