Halloween party ideas 2015


अमळनेर शिक्षण विभाग, तालुका क्रिंडा समिती व प्रताप काँलेज यांच्या संयुक्तपणे योगदिवस साजरा.

योगदिनानिमित्त ४३०० विदयार्थ्यांनचा सहभाग

अमळनेर प्रतिनिधी- 21 जून हा जागतिक योग दिनानिमित्त अमळनेर शहरातील सर्व शाळांनी संयुक्तपणे योग दिवस उत्साहपूर्ण  साजरा करण्यात आला.

  योग दिनानिमित्त योगाचे मानवी जीवनामध्ये महत्व योगाचे फायदे या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन क्रीडा शिक्षकांनी केली अमळनेर शहरातील सर्व शाळांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांचे अभिनंदन गट शिक्षणाधिकारी आर. डी महाजन यांनी केले.

       अमळनेर येथे आज सं.७.०० वा.शिक्षण विभाग ,तालुका क्रीडा समिती व प्रताप काॕलेज यांच्या विदयमाने आयोजित सामुहिक योग दिन कार्यक्रम अतिशय उत्साने साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील ४३००विद्यार्थी व ४००शिक्षक  एकत्र  योगासने केली. यावेळी शासकिय अधिकारी ,शिक्षक ,प्राध्यापक ,एस.सी सी मुले,एन. एस.एस मुली,हजर होते.कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री.आर डी महाजन ,विस्तार अधिकारी श्री.पी डी.धनगर,प्राचार्या सौ.ज्योती राणे,तालुका क्रीडा प्रमुख श्री,एस .पी वाघसर,यांनी परिश्रम घेतले.यावेळी शहरातील नामवंत व्यक्ती ,डाॕक्टर,अधिकारी  उपस्थितउत्तर  होते.हा कार्यक्रम योग गुरु व तज्ञ श्री.गजानन  माळी,अर्चना सनेर,प्रा.खराटे सरांनी योगाभ्यास करुन घेतला.

           अमळनेर शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.