Halloween party ideas 2015

जळगांव प्रतिनिधी

जळगाव जिल्हा कोरोनाचा मुक्त होण्याच्या मार्गावर असताना अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील ६० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने तालुक्यासह शहरात प्रचंड खळबळ झाली आहे. सावखेडा,मुंगसे, रुंधाटी व दापोरी ही गांवे प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत सील केली. सदर महिला मुंगसे येथून चोपडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. त्यानंतर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर शुक्रवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी ह्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परिणामी आरोग्य यंत्रणा हादरली. या पार्श्वभूमीवर रात्री १० वाजता प्रांताधिकारी सिमा अहीरे यांनी सर्व अधिकारी व पोलिसांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या. आरोग्य यंत्रणा व पोलीस हे मुंगसे येथे रवाना झाले. असून ह्या महीलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा शोध घेत आहेत. बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.