Halloween party ideas 2015



अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात कोव्हीड 19 संशयित रुग्ण आढळल्याने आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे 20 एप्रिल पासून कापूस खरेदी उशिरा सुरू होण्याची शक्यता असून वरिष्ठ कार्यालयाचा आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आपला माल आणण्याची घाई करू नये व गर्दी करू नये वेळेवर त्याबाबत सूचित करण्यात येईल सध्या तीन दिवस तालुक्यात संचारबंदी व बंद असल्याने कुणीही कापूस विक्री साठी आणू नये व गर्दी करू नये असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. त्यासाठी आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहावी त्यासाठी आपणास सूचित करण्यात येईल याची काळजी घ्यावी शासन सर्वांचा माल घेण्यास बांधील आहे. याचबरोबर कोणत्याही शेतकऱ्याचा माल घेतल्याशिवाय खरेदी बंद होणार नाही त्यामुळे मोजणी करण्यासाठी आणू नये व उगाच प्रशासनावर ताण वाढू नये याची काळजी घ्यावी
आपलाच
अनिल भाईदास पाटील
आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.