दाणा बाजारात चारापाणी अभावी मृत दोन पक्षींचा फोटो बघुन हळहळले मन
प्रफुल्ल व प्रदिप जगन्नाथ पाटील भावंडांचे दातृत्व
दि १९ शेळावे ता पारोळा
चार दिवसापुर्वी एका वृत्तपत्रात जिल्हयास्तरावरील दाणा बाजार येथे पाण्याच्या कोरडया मातीच्या बाळग्याजवळ दोन पक्षी मृत पावलेला फोटो बघुन जि प प्राथ शाळा धाबे ता पारोळाचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे व त्यांच्या कार्यात सदैव अग्रेसर त्यांच्या पत्नी चित्रा पाटील यांच्या मनाला खुप वाईट वाटले .
मागच्या महिन्यात धाबे ता पारोळा गावात शेळ्या व गुरे चारणाऱ्या ग्रामस्थांना त्यांनी पारोळ्याचे शंकर उर्फ बापू कुंभार यांच्या माध्यमातुन पक्षांसाठी शेतात व जंगल भागात ठेवण्यासाठी पाण्याचे मातीचे बाळगे वाटप केले . पण शहरात याची गरज पडेल असे वाटले नव्होते .लॉक डाऊनमुळे अन्न धान्याचे व्यापार व दुकाने बंद असल्याने पक्षांना चारापाणी मिळणे बंद झाले .नेमके हेच लक्षात घेऊन आजुन याचे काही पक्षी तरी बळी ठरू नयेत म्हणुन त्यांनी प्रयत्न सुरू केले .
पाण्याची मातीचे बाळगे मिळणे दुर्लभ असतांनाही त्यांनी काही बाळगे एका ठिकाणाहुन उपलब्ध करून आजुन लवकरात लवकर शंभर तरी बाळगे बनवुन देण्याची विनंती व ऑर्डर एका माती कारागीर परीवाराला दिली आहे .
नुसते पाणीचे बाळगे न वाटप करता त्या सोबत पक्षांना अन्न म्हणुन तांदुळही उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी ठरविले . त्यांच्या भागात राहणारे प्रफुल्ल व प्रदिप जगन्नाथ पाटील या युवा मित्रांशी त्यांनी याबाबत चर्चा केली तर दोन्ही बंधुंनी यासाठी शक्य ती मदत त्यांच्याकडुन देण्याची ईच्छा दर्शविली .
त्याचाच एक भाग म्हणुन आज शहरातील काही विदयार्थ्यांना पाण्याचे बाळगे व त्या सोबत महिना पंधरा दिवस येणाऱ्या पक्षांना पुरेल एवढा तांदुळही प्रत्येकाला वाटप करून आपल्या गच्चीवर ठेवण्यास सांगुन याबाबत मदत करण्याचे मार्गदर्शन केले .
यावेळी मुख्याध्यापक साळुंखे म्हणाले की माणसांसाठी तर माणसे झटतच आहेत .आनंदाची व कौतुकाची गोष्ट आहे . त्या सोबत निर्सगातील या मुक्या जीवांनाही उन्हाळयाच्या या तीव्र वातावरणात चारापाणी मदतची गरज आहे . आमचे युवा मित्र प्रदिप पाटील व प्रफुल्ल पाटील हे अशा मदतीच्या कामासाठी सदैव तत्पर असतात . त्यांच्या या अनमोल सहकार्या बद्दल आभार .
शहरातही या गोष्टीची गरज ओळखुन आम्ही हा उपक्रम सुरू केला . विशेष म्हणजे विदयार्थ्यांना पक्षींची आवड असते व ते त्यांना वेळेवर पाणी आणि दाणे टाकण्याचे काम खात्रीने व हौसेने करतील म्हणुन त्यांना सहभागी केले . तसेच बालकांमध्ये पर्यावरण शिक्षण , मुल्यशिक्षण, मुक्या जीवांविषयी प्रेम,अहिंसा, करुणा, संवेदना निर्माण करण्याचेही या मागे ध्येय आहे .
