Halloween party ideas 2015


कोरोनाच्या गंभीर पार्श्वभूमीवर डॉक्टर दिवसाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...डॉ. रवींद्र भोळे

उरुळी कांचन,(वार्ताहर) :- रुग्णांच्या औषधांच्या, इंजेक्शनच्या आणि उपचारांच्या वेळा सांभाळताना स्वतःच्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक कधी चुकते याचेही त्यांना कधी भान राहत नाही. परंतु तितक्याच तन्मयतेने आणि सेवाभावाने प्रत्येक डॉक्टर कार्य करीत असतो. आज कोरोना सारख्या गंभीर संकटातही तितक्याच खंबीरपणे प्रत्येक डॉक्टर कार्य करीत आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे जीवाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यासाठी धडपडणारा प्रत्येक डॉक्टर पहिला की, मला त्यांच्याविषयी खरोखर खूप कृतज्ञता वाटते असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाचे सचिव अमोल भोसले, हवेली तालुका महानुभाव परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे यांच्या हस्ते डॉक्टर दिवसा निमित्त उरुळी कांचन परिसरातील गोरगरीब रुग्णांची सेवा करत असल्याने डॉ. रवींद्र भोळे यांचा सन्मान करण्यात आला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.