Halloween party ideas 2015


संत शिरोमणी सावता महाराज
*पुण्यतिथी सप्ताह निमित्त*
सावता सागर प्रेमाचा आगार
*राज्यस्तरीय निबंध स्पर्धा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

अमळनेर तालुका सर्व माळी समाज संघटना पंच मंडळे, महिला मंडळे व सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था अमळनेर आयोजित विश्वसंत सावता महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त 'सावता सागर प्रेमाचा आगर'
समस्त सावता भक्तांना जय सावता👏रविवार दि.१९ जुलै २०२० रोजी विश्वसंत सावता महाराज पुण्यतिथी आहे.त्या निमित्त "सावता सागर प्रेमाचा आगर' राज्यस्तरीय निबंध स्पर्धा व ऑनलाइन कार्येक्रम आयोजित केला आहे. संत शिरोमणी सावता माळी यांच्या कृपेने आम्ही आपल्या सेवेत घेऊन आलोत 'सावता सागर प्रेमाचा आगर' संत सावता महाराज यांच्या जिवन कार्याविषयी २५० ते ३०० शब्दाचा निबंध लिहून नाव पत्ता नंबर सह पाठवायचा आहे.तसेच अभंग, कविता, यांचा व्हिडीओ बनवून7083887603(अण्णासो.उदय खैरनार सचिव क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था अमळनेर) 9273326111(प्रवीण बी.महाजन अध्यक्ष सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था अमळनेर) या व्हाटसॅप न. ला नाव पत्ता मो.न.सह पाठवायचा आहे.*
*आपला निबंध,व्हिडीओ सावता प्रबोधन या चॅनल ला प्रसारीत करण्यात येईल व योग्य वेक्त्तीला संत सावता महाराज व फुले दाम्पत्य यांची एकत्रित प्रतिमा,रोख रक्कम व संत सावता महाराज यांची पुस्तिका भेट देऊन समस्त माळी समाज संघटना व सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था अमळनेर तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.*
*सदर कार्येक्रमात कोणत्याही प्रकारची अट नाही (वय इतर) कोणीही निबंध,अभंग,कविता पाठवू शकतात सदर स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र्र राज्यासाठी आहे.पाठवण्याची अंतिम तारीख १७ जुलै २०२० पर्येंत आहे.तसेच सहभागी सर्व सावता भक्ततांना घरपोच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल कार्यक्रमाचे
आयोजक अमळनेर तालुका सर्व माळी समाज संघटना पंच मंडळे, महिला मंडळे व सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था अमळनेर सर्व विश्वस्त पदाधिकारी अमळनेर जि. जळगांव (महाराष्ट्र्र) यांनी केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.