*युवा मंच तर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान*
संपूर्ण जगात उद्भवलेल्या कोविड - 19 या आजाराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे अशा महाभयंकर परिस्थितीत काही योध्दे आपल्या जीवावर उदार होऊन जनतेचा जीव वाचवण्यासाठी अनेक प्रकारची सेवा करीत आहेत. वेळोवेळी देवदुतासारखे जनतेसाठी धावून आले आहेत. त्यांच्या या असामान्य कामाची दखल महात्मा जोतीबा फुले युवा मंच आॅल इंडिया ने घेतली आहे.
असेच समाजसेवक पिं. राजा बुलढाणा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन चव्हाण,समाजसेविका सौ. पदमा जयंत गिऱ्हे - माहुर, गणेश शंकर माळी - पुणे, अशोकभाई बागुल- सुरत, महाराष्ट्र पोलिस नांदेडचे एकनाथ क्षीरसागर, मालेगाव भाजपाचे मा. जिल्हा अध्यक्ष सुनिल गायकवाड, नगरसेवक मदन गायकवाड ,अमळनेर येथील पत्रकार ईश्वर महाजन,
यांच्यासह चाळीस कोरोना योद्ध्यांना महात्मा जोतीबा फुले युवा मंच, आॅल इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर भाऊ संतोष माळी, राष्ट्रीय महासचिव नरेंद्र शिवाजी बागुल यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
