Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस व्यस्त आहे. कोणताही अधिकारी असो त्याच्यामागे अनेक कामामध्ये गुरफटला आहे.पण काही अधिकारी दुसर्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे दुर्मिळ असतात.समाजात काही माणसं आपल्या। कर्तृवाने इतकी मोठी व आदरणीय होतात ते अधिकारी सर्वसामान्य नागरीकाच्या हदयात राहतात असेच एक जळगांव जिल्हयाचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आहेत. 

    कळमसरे येथील उपसरपंच मुरलीधर राजाराम महाजन यांनी कळमसरे येथे लोकवर्गणीतून व श्रमदानातून सुरू असलेला" राम नाम पाझर तलाव" पहाण्यासाठी आपण यावे अशी जिल्हाधिकारी यांना गळ घातली. जिल्हाधिकारी यांनी क्षणाचा विचार न करता आमत्रंण स्विकारले.कळमसरे गावात आतापर्यंत जिल्हाधिकारी गावात येण्याची पहीली घटना असेल व ते   राम नाम पाझर तलावांची पहाणी केली एवढे मोठे काम गावकरी बांधवानी सुरू केल्याने त्यांना आनंद वाटला.व स्वतः त्यांनी श्रमदान केले.शासनस्तरावर काही मदतीसाठी सदैव कटिबद्ध आहे असे सांगून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.गावातील लोकांचा विश्वास बसत नव्हता आमच्याशी जिल्हाधिकारी बोलत आहेत. नंतर उपसरपंच मुरलीधर राजाराम महाजन यांच्या घरी किशोरराजे यांनी परीवाराची विचारपूस केली. घरी परीवाराबरोबर जेवनांचा आस्वाद घेतला. हि गोष्ट उपसरपंच महाजन यांच्यासाठी  अविस्मरणीय क्षण होता.

   नंतर राम नाम पाझर तलावाच्या कामी रामदेवजी बाबा मित्र मंडळ, ओमशांती परीवार, कळमसरे व विकास फौडेशन,मारवड व परिसर विकास मंचाचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य, व ग्रामस्थ मंडळ व ट्रक्टर मालकांचे सहकार्य लाभल्यामुळे सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. शेवटी जिल्हाधिकारी म्हणाले "गाव करी,ते राव काय करील". अशीच गावकऱ्यामध्ये एकजूट राहिली  तर गावाचा पाण्यासाठी आपण एकत्र आला आहातं गावात जलक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगितले. उपसरपंच मुरलीधर महाजन व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी निंबाळकर यांचे आभार मानले.

फोटो

कळमसरे येथे उपसरपंच मुरलीधर महाजन यांच्या घरी जेवनांचा आनंद घेतांना जिल्ह्यधिकारी किशोरराजे निंबाळकर

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.