अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर नगरपालीकेच्या माध्यमातून अनेक कामे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, व माजी आमदार साहेबराव पाटील करीत असतांना मे महीन्याचे कडक ऊन डोक्यावर घेत प्रभाग नंबर चौदामध्ये नगरसेविका कमलबाई पिंताबर पाटील व सामाजिक कार्यकर्ते रविद्र पाटील यांच्या बरोबर जेथे हँडपंप व बोरवेल नादुरुस्त असेल ते दुरुस्ती केले जाईल असे सांगितले.
मे महीना असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जे हँडपंप नादुरुस्त असतील त्याची पाहणी करुन युदधपातळीवर ते दुरुस्ती केले जातील. प्रभाग १४ मध्ये शिवकाँलनी,विदयाविहार काँलनी,गुरूकृपा काँलनी,ओमशांती नगर, आर के.नगर, भागातील खराब नादुरुस्त हँडपंप व बोरवेल दुरस्तीची पाहणी माजी आमदार साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील , नगरसेविका कमलबाई पाटील रवि पाटील, विक्रांत पाटील नगरसेवक विवेक पाटील,यांनी केली.पुढे पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी हि खबरदारी घेतली जात आहे.
प्रभाग चौदामध्ये मध्ये नवीन धाबे ,प्रभाग चौदामध्ये कोणतीही समस्या असो ती माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग चौदाचे सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील प्रयत्नशील असतात.
फोटो
अमळनेर येथे प्रभाग चौदामध्ये हँडपंपची पाहणी करतांना माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, रवि पाटील, विक्रांत पाटील व मान्यवर
छाया ईश्वर महाजन अमळनेर