Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र पत्रकार संघाची नुकतीच सहविचार सभा उत्साहात पार पडली.अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी होते.

महाराष्ट्र पत्रकार संघाचे ३जून रोजी अक्कलकोट जि सोलापूर येथे  वर्धापनदिनानिमित्त जाण्याबाबत चर्चा केली गेली त्याबाबत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सभासदांशी चर्चा केली जाईल असे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी सांगितले.

         महात्मा फुले विचार अभियान महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामाजिक क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे त्यांना ११ मे २०१८ ला  अभियानाचे संयोजक अजीत जाधव महात्मा फुले पुरस्कार देऊन पुणे येथे सहपत्निक गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे  महाराष्ट्र पत्रकार संघ नेहमी गुणवंताच्या पाठीवर कौतुकाची थाफ देऊन सत्कार करीत असते.यासाठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभते

       महात्मा फुले विचारमंचाचे अध्यक्ष प्रविण महाजन यांचा सत्कार महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी, एन.ए.साळुंखे,  मल्हार संघाचे जेष्ट संघटक श्रावण तेले,महात्मा फुले मंचाचे कार्यालय प्रमुख दिपक महाजन,निलेश चौधरी,विजय मोहरे यांनी सत्कार केला.

   सत्काराला उत्तर देतांना प्रविण महाजन म्हणाले कि.महाराष्ट्र पत्रकार संघ नेहमी गुणवंत विद्यार्थी, पालक,महीला यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन सत्कार कार्य करणण्यास प्रेरणा देत असतात. मी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या ऋणात राहू इच्छितो असे सांगितले. प्रस्ताविक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष एन.ए.साळुंखे यांनी केले तर आभार गायकवाड हायस्कूलचे पर्यवेक्षक

श्रावण तेले यांनी केले.

फोटो

अमळनेर येथे महात्मा फुले पुरस्कारासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रविण महाजन यांची निवड झाल्यामुळे सत्कार करतांना महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी व पत्रकार बांधव

छाया- श्रेयस माळी अमळनेर)

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.