अमळनेर प्रतिनिधी-स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना ध्येय डोळयासमोर ठेवा,त्यासाठी कठोर परीश्रम केल्याशिवाय आपले उद्दिष्ट साध्य होत नाही. कधीकधी आपण लहान पदासाठी स्पर्धापरीक्षा देत असतो अशावेळी आपणास अपयश येते.अशावेळी खचून न जाता असे समजावे कदाचित आपले स्वप्न मोठे असले पाहीजे.असे अमळनेर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत अमळनेरचे तहसीलदार प्रदीपजी पाटील बोलत होते.
व्यासपीठावर प्रांताधिकारी संजय गायकवाड, प्रा.एस.ओ.माळी, गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्हाडे,वाचनालयाचे अध्यक्ष आत्माराम चौधरी, सिनेट सदस्य दिनेश नाईक,प्रा.भावसार, ब्राम्हणकर सर उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेच्या आतापर्यंतची यशस्वी घौळदौड यांची माहिती केंद्र संचालक ऊमेश काटे यांनी सांगितली. तर केंद्र अध्यक्ष विजयसिग पवार यांनी आतापर्यंत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील पन्नास विद्यार्थी चांगल्या पदावर नोकरीला लागले यासाठी पवार सर व त्यांचे सहकारी बांधव व शिरसाडे गावातील नागरीकांचे मनापासून अभिनंदन करतो असे कार्यक्रमात मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तर या स्पर्धा परीक्षा केंद्रात अनेक युवक,युवती एम.पी.एस.सी.उत्तीर्ण झाले आता युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवक व युवतींना प्रा एस.ओ।माळी यांनी पन्नास हजार रूपये बक्षीस दिले जाणार आहे जर एकाच वेळेस पाच मुले उत्तीर्ण झाले तरी मी दोन लाख पन्नास हजार रूपायाचे बक्षिसे दिली जाणार आहे त्यामुळे युवक व युवतींनी बक्षीस घेण्यासाठी तयार राहावे असे सांगितले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षीसपात्र विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस दिली गेली.यावेळी स्वप्निल वानखेडे, हर्षीली पाटील,
जयेश काटे,शरद पाटील, सोपान भवरे, आर.जी.राडोळ,सतीश कागणे, भूषण पाटील, शरद सैदाणे, दिलीप शिरसाट, उदय पाटील, चंद्रकांत पाटील, उपस्थित होते. सुत्रसंचालन विजयसिग पवार यांनी केले. तर आभार शरद पाटील यांनी मानले. तिन दिवसीय कार्यशाळेला शंभर विद्यार्थी उपस्थित होते.