*अमळनेर येथे पूज्य सानेगुरुजी मोफत वाचनालयाच्या वतीने तिन दिवसीय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचा समारोप*
अमळनेर प्रतिनिधी-साने गुरूजी वाचनालयाच्या वतीने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला आहे.स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख विजयसिग पवार व त्यांचे सहकारी बांधवामुळे तालुक्यात शैक्षणिक क्रांती सुरू झाली आहे असे अमळनेर येथे सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व कार्यशाळेचा समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी अमळनेरचे प्रांतधिकारी संजय गायकवाड बोलत होते.
पूज्य सानेगुरुजी मोफत वाचनालय अमळनेर संचलीत पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास तिन दिवसीय कार्यशाळेचा समारोप व बक्षीस वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रम अमळनेरचे प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीपजी पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिर्हाडे ,प्रा.एस.ओ.माळी, वाचनालयाचे अध्यक्ष आत्माराम चौधरी, सिनेट सदस्य दिनेश नाईक, प्रा.भावसार सर,होते.प्रस्ताविक उमेश काटे यांनी केले. स्पर्धा परीक्षा केंद्राचा इतिहास व आतापर्यंत किती विद्यार्थी नोकरीस लागले याबाबत माहीती स्पर्धा परीक्षा केंद्राचे अध्यक्ष विजयसिग पवार यांनी सांगितले.
समारोप व बक्षीसवितरणात तहसीलदार प्रदीपजी पाटील यांनी सांगितले की निराश न होता प्रयत्न सोडू नका.अपयशातूनच शेवटी मार्ग यशाकडे जातो. तर गटशिक्षणाधिकारी अशोकजी बि-हाळे यांनी सानेगुरुजीच्या नावाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेरला सुरु झाले आहे त्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. आज तालुक्यातील पन्नास पेक्षा जास्त विदयार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊन वेगवेगळ्या उच्च पदावर नोकरी करीत आहे.यासाठी विजय पवार सारखा शिक्षकांचे योगदान मोठे आहे.असे सागितले. तर वाचनालयाचे अध्यक्ष आत्माराम चौधरी यांनी आमच्या सानेगुरुजी वाचनालय व ग्रंथालयच्या वतीने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्याने वाचनालयाचे महत्त्व वाढले असून,ग्रामीण भागातील युवकांना एक विचारपिठ निर्माण करता आले याचा विशेष आनंद होत आहे. असे आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यशाळेत मार्गदर्शन प्रा.जयदीप पाटील, स्वप्निल वानखेडे,शरद सैदाणे, भूषण पाटील, गोपीचंद नेरकर यांनी केले तर कार्यशाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धा परीक्षा पास झालेली हर्षाली पाटील हिने आपल्या यशाचे रहस्य सांगताना सर्व श्रोते व मान्यवर भावनिक झाले. विनाअनुदानित शाळेत वडीलांना दहा वर्षे विनावेतन काम करावे लागले त्यांची मेहनत व संघर्ष त्यांच्या मुलीने वाया न जावू देता त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याचा मनस्वी आनंद होत आहे असे सांगितले. कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले व उपक्रमशिल शिक्षक उदय पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्वर महाजन,सतीश कागणे,व भुषण पाटील शरद सैदाणे दिलीप शिरसाट यांचा प्रांतधिकारी संजय गायकवाड यांनी शाल देऊन सत्कार केला. आभार प्रर्दशन शरद पाटील यांनी केले.यावेळी जयेश काटे, सोपान भवरे, आर जी.राठोड सर,व कार्यशाळेचे विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.