Halloween party ideas 2015

मान्यवरांच्या प्रतिक्रिया-
सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्रातून शैक्षणिक क्रांती-संजय गायकवाड-प्रांतधिकारी अमळनेर
निराश न होता,ध्येय डोळ्यासमोर ठेवा-तहसीलदार प्रदीपजी पाटील
अमळनेर तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामुळे तळागाळातील मुले नोकरीला-गटशिक्षणाधिकारी अशोकजी बि-हाळे
वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा सुरू झाल्याचा मोठा आनंद-आत्माराम चौधरी
अध्यक्ष-सानेगुरुजी वाचनालय व ग्रंथालय अमळनेर
अमळनेर प्रतिनिधी-पूज्य सानेगुरुजी मोफत वाचनालय अमळनेर संचलीत पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास  तिन दिवसीय कार्यशाळेचा समारोप व बक्षीस वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रम अमळनेरचे प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीपजी पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिर्हाडे ,प्रा.एस.ओ.माळी, वाचनालयाचे अध्यक्ष आत्माराम चौधरी, सिनेट सदस्य दिनेश नाईक, प्रा.भावसार सर,होते.प्रस्ताविक उमेश काटे यांनी केले. स्पर्धा परीक्षा केंद्राचा इतिहास व आतापर्यंत किती विद्यार्थी नोकरीस लागले याबाबत माहीती स्पर्धा परीक्षा केंद्राचे अध्यक्ष विजयसिग पवार यांनी सांगितले. कार्यशाळेत मार्गदर्शन प्रा.जयदीप पाटील, स्वप्निल वानखेडे,शरद सैदाणे, भूषण पाटील, गोपीचंद नेरकर यांनी केले तर कार्यशाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धा परीक्षा पास झालेली हर्षाली पाटील हिने आपल्या यशाचे रहस्य सांगताना सर्व श्रोते व मान्यवर भावनिक झाले. विनाअनुदानित शाळेत वडीलांना दहा वर्षे विनावेतन काम करावे लागले त्यांची मेहनत व संघर्ष त्यांच्या मुलीने वाया न जावू देता त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याचा मनस्वी आनंद होत आहे असे सांगितले. कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले व उपक्रमशिल शिक्षक उदय पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्वर महाजन,सतीश कागणे,व भुषण पाटील शरद सैदाणे दिलीप शिरसाट यांचा प्रांतधिकारी संजय गायकवाड यांनी शाल देऊन सत्कार केला. आभार प्रर्दशन शरद पाटील यांनी केले.यावेळी जयेश काटे, सोपान भवरे,राठोड सर,व कार्यशाळेचे विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.