*समाजबांधवांनकडून अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)
क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांना जनते कडून 11 मे 1888 रोजी महात्मा पदवीने सन्मानित करण्यात आले पदवीसमारंभाच्या सुस्मरणीय दिनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सामाजिक कार्येकर्त्यांना महात्मा फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते महात्मा फुले यांच्या 130 व्या पदवी समारंभाच्या दिनी अमळनेर येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रवीण बी.महाजन यांना उत्कृष्ट समाज संघटन,विनामूल्य वधु-वर सुचक केंद्र चालवुन खेडोपाडी फिरून परिचय मेळावे,कार्येकर्ता संघटन मेळावे, शेतकरी युवकांना शेती सोबत व्यापार करा नोकरिवालाच वर पाहिजे हा हट्ट पालकांनी सोडावा ,समाजातील विधवा,अपंग,अंध पांढरे कोड असलेल्या महिलांचा सन्मान करणे, महिला संघटन मेळावे कार्येक्रम राबवणे,सामाजिक कार्येकर्त्यां महिला सन्मान सोहळा राबवणे,ग्रामीण भागातील समाजातील पूर्वजांच्या जुन्या वास्तुचे उजळणी करणे तसेच बेरोजगार युवकांना व्यापाराकडे आकर्षित करणे महात्मा फुले यांचे विचारांचा प्रसार इ.समाज प्रबोधन पर त्यांना महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कार 2018 देऊन दिनांक 11 मे रोजी महात्मा फुले स्मारक खानवाडी पुरंदर जि. पुणे येथे महात्मा फुले विचार अभियान महाराष्ट्र राज्य तर्फे संयोजक अजित जाधव यांच्या कडून मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातून 17 समाजसेवकांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये केल्या बद्दल सदर पुरस्कार दरवर्षी देण्यात येत आहेत.
त्यांचे समाजबांधव व मित्रपरीवारकडून अभिनंदन होत आहे.