अमळनेर प्रतिनिधी-
*राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा.जोतीराव फुले यांच्या विचारांनी समस्त जगातील* *सामाजिक क्षेत्रातील कार्येकर्ते कार्ये करत असुन त्यांचे विचार हे जगाला तारू शकतात त्यांच्या विचाराने विश्वात अनेक बदल घडवले आहेत.तेच विचार देशाला महासत्ता बनवतील असे महात्मा फुले विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
* .आज खऱ्याअर्थाने त्यांच्या मुळजन्म गावी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व जाती धर्मातील समाज सेवक महिला भगिनींना विविध संस्थांना पुरस्कार देऊन महात्मा फुले विचार अभियान महाराष्ट्र राज्य यांनी फुलेंचे विचारांचा प्रसार करण्याचे मुख्यकार्याला क्रांतीकारी स्वरूप दिलेले असुन संपूर्ण महाराष्ट्रातातील सामाजिक क्षेत्रातील कार्येकर्ते ,महिला,युवती यांना पुरस्कार देऊन एक ऊर्जा बळ दिलेले आहे. असे विचार क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रवीण बी.महाजन यांनी महात्मा फुले स्मारक खानवाडी पुरंदर पुणे येथे महात्मा फुले यांच्या 130 व्या पदवी समारंभाच्या दिनी मांडले ते महात्मा फुले पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.यावेळी महाराष्ट्रातून मान्यवर समाज सेवक महिला भगिनी युवती युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्येक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले विचार अभियानाचे संयोजक प्रवीण सुरेश महाजन (पुणे )यांनी तर आभार अजित जाधव यांनी मानले*