गटविकास अधिकारी संदीप वायाळ
यांना गटविकास अधिकारी पदाचे अधिकार कायम ठेवा
सरपंच सेवा संघाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
उपरोक्त विषयांन्वये आम्ही सर्व सरपंच व पदाधिकारी आपणास विनंती करतो कि, पंचायत समित अमळनेर येथे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी श्री संदीप वायाळ यांनी संपुर्ण तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. दिवस रात्र मेहनत घेउन तालुका हगणदारी मुक्त करण्यासाठी संपुर्ण महारादात एकमेव अधिकारी झपाटल्या सारखा फिरत होता. मागील वर्षी सुध्दा दुष्काशी सामना करतांना ग्रामीण भागात पाणी टॅकरचं उत्तम नियोजन केले. 22 मार्च पासुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. सध्द स्थितीत मग्रारोहयो च्या कामांना सुरवात झाली आहे त्यासाठी अनेक सरपंचाना योग्य सल्ला व मार्गदर्शन वायाळ साहेब करीत आहे सर्व सरपंच सतत त्यांच्या संर्पकात असल्याने ग्रामीण भागातील जनतेला सन्मान व न्याय मिळत आहे. असे असतांना अचानक पणे या अधिकारी चा पदभार का काढण्यात आला हे तालुक्यातील जनतेला मोठे कोडेच आहे. अमळनेर तालुका घरकुल योजनेत जिल्हात अग्रेसर आहे. अशी अनेक विकास कामे जोरात सुरु असतांना कसलिही लालसा न ठेवता प्रामाणिक पणे
काम करणारया अधिकारी याचा पदभार काढणे किती न्यायिक ठरेल याचा वरिष्ठांनी विचार करावा.
तरीही 10 कामे चांगली होत असतांना अत्यंत कर्तव्य दक्ष असलेल्या अधिकारी कडुन सुध्दा एखादया कामात त्रुटी राहु शकते. पण अचानक पणे अधिकार काढुन ताल्युक्यातील जनतेला दिशाहिन करणे ही बाब अत्यंत दुर्दवी व निंदनिय आहे.शिवाय ही बाब ताल्युक्याचा विकासाला अडथळा ठरणारी आहे. तरी महोदय, एका चांगल्या प्रशासकिय अधिकारी वर अन्याय होणार नाही यासाठी आपण सदर बाबीत विषेष लक्ष घालावे. अन्यथा तालुक्यातील नव्हे तर जिल्हा भरातील सर्व सरपंच पदाधिकारी आक्रमक भुमिका घेतील. याची आपण गाभिर्याने नोंद घ्यावी.असे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच ऊमेश साळुंखे,प्र तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांच्यासह रामकृष्ण पाटील तळवाडे,सौ उज्जला पाटील नगांव,दगडू सैदाणे धार,सुनील पाटील निभोंरा,पकंज राजपूत कळंबू,केदारसिंग जाधव हिंगोणा,दिनेश पाटील पिंपळे खु,अशोक पाटील भरवस, सौ हर्षदा पाटील मंगरूळ, सुभाष पारधी पिंपळे, काशिनाथ माळी मुडी,प्रविण पाटील ब्राम्हणे सह अनेक सरपंच पदाधिकारी यांच्या पत्रकावर सहया आहेत.
संदीप वायाळ या कार्यक्षम अधिकारी यांना पदभार अमळनेर गटविकास अधिकारी म्हणून दयावा यासाठी ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री ,अमळनेर आमदार, यांना माहितीसाठी पत्र पाठवले आहेत.
