पुज्य सानेगुरुजी माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांच्या सुपुत्राचे लग्नात जुन्या चालीरीतीना दिला फाटा.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सध्या देशात कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासन प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत जुन्या चालीरीती,देणेघेणे यांना फाटा देत अत्यंत मोजक्या नातेवाईक व मित्रपरीवारांच्या उपस्थित आदर्श विवाह पार पडला.
सविस्तर माहिती अशी आहे की संत गजानन सेवा संस्थानचे अध्यक्ष, व सानेगुरुजी माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांचे चिरंजीव चि.मोहीत (BE Mechanical),व जवखेडा ता.शिरपूर येथील दिलीप वसंतराव भामरे यांची कन्या किरण(MSC physic) यांचा विवाहदिनांक 29 जून 2020 वार सोमवारी
अमळनेर येथे विदयाविहार काँलनीत राहत्या घरी संत गजानन महाराज यांच्या आशिर्वादाने आनंददायी वातावरणात पार
पडला.यावेळी लग्नात जुन्या चालीरीती यांना फाटा देत कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करताअत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.
यावेळी प्रा.आर.बी.पवार, सौ ज्योती पवार, दिलीप भामरे,शालिनी पाटील, कल्पेश पाटील, सौ प्रियंका पाटील उपस्थित होते.
विवाह यशस्वीतेसाठी अशोक भावे,नितीन भावे,संजय पाटकरी,कविश पाटील, महेश पाटील, गोपाल पाटील, विजू येवले,आनंद वायरमन, व संत गजानन परीवारातील व मित्र परिवाराने प्रयत्न केले.
