अमळनेर
कोरोना या भयंकर आजारामुळे केंद्र व राज्य सरकारांनी जिल्हा, तालुका, शहर, खेडे गावातील वस्ती असतील इ.लॉकडाऊन केले असून त्यासाठी कडक नियम केले आहेत तरी काही नागरिक विनाकारण नियमांचे उल्लंघन करीत अ un unसून वारंवार सांगूनही मोटारसायकल, फोरव्हीलर घेऊन महत्त्वाची कामे नसूनही बाहेर फिरत असून ते त्यांच्या सोबत इतर नागरिकाच्या जीवाशी खेळत आहेत.त्यांना आळा घालून इतर नागरिक सुरक्षित रहावेत त्याकरिता अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे गावाजवळ मोठा पाईप व काटे टाकून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून काही अत्यावश्यकता (इमर्जन्सी) असेल तरच रस्ता सुरू करण्यात येईल यांची सर्वानी नोंद घ्यावी.रस्ता बंद करतांना सर्व शक्ती संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील निंबा दला चौधरी जयवंत दगा पाटील सुभाष दौलत पाटील महेंद्र गटा पाटील संतोष मन्साराम पाटील ज्ञानेश्वर दिलीप पाटील जीवन उत्तम पाटील युवराज दगा पाटील व सर्व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे
