Halloween party ideas 2015


एन.सी.सी अधिकारी संभाजी पाटील यांच्या काढून .दि.१३ मार्च ते १५ मार्च पर्यंत कोरोना जनजागृती अभियान चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये.
विद्यार्थी व पालकांमध्ये ‘कोरोना’ विषयी जनजागृती

चाळीसगांव प्रतिनिधी

कोरोना व्हायरस बचाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी व पालकांमध्ये ‘कोरोना’ विषयी जनजागृती शाळेत कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस बचाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाबाबत जनता व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने शाळेत कोरोना बचाव कार्यशाळेत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ए.बी.हायस्कूलचे NCC अधिकारी ANOs संभाजी पाटील यांनी कोरोना व्हायरसविषयी ncc च्या कडेटद्वारे डेमो देवून विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायांचीही माहिती देण्यात आली. कोरोना आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित असतात. या विषाणूचा हवेतून प्रसार होत नसून, लागण विशेषत: डोळे, नाक व तोंडाद्वारे होते म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मास्क, रूमालचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल.
कोरोना आजारासोबतच इतर आजारांपासून बचाव व्हावा, विद्यार्थ्यांना लक्षणे व उपाययोजनांची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेतून आरोग्यदायी सवयींची रूजवणूक करण्यात आली. तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, उपचारासाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना विषाणूबद्दल काळजी करू नका, सावध रहा, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवा असे शिक्षिका सुरेखा पागृत यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना आजार लक्षणे व उपाययोजनाच्या माहितीपत्रकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. 

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.