जुनी पेन्शन कोअर कमिटी शिक्षण संघर्ष संघटनेचा निर्णय* ( १ नोव्हेंबर 200५ पूर्वी नियुक्त त्यानंतर १०० % वर आलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव )
जळगांव प्रतिनिधी
*_जगामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या संसार्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भभवलेली आहे. या निमित्ताने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यास सहमती दर्शविली आहे. सरासरी महाराष्ट्र राज्यात 20 ते 22 हजार कर्मचारी असून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे._
जुनी पेन्शन कोअर कमिटी शिक्षण संघर्ष संघटनेने* आपले एक दिवसाचे वेतन कपात करून घ्यावे. असे अधिकार प्रशासनाला देत आहोत.कोरोना विषाणूमुळे राज्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. आपले सरकार या आपत्तीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे. आमची एक नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये एक दिवसाचे वेतन देण्यास आम्ही तयार आहोत.
जुनी पेन्शन कोअर कमिटी अध्यक्षा- सौ. संगीता ताई शिंदे. कार्याध्यक्ष- श्री. सुनील भोर, श्री. सचिन पगार. सचिव- श्री. महेंद्र हिंगे, श्री. दिलीप डोंगरे. उपसचिव-श्री. संजय इघे, श्री. योगेश पाटील राज्य संघटक-श्री. शरद तिरमारे, श्री.विकास दिवे सर, श्री. सुनील दानवे, श्री. वाजिद सर, श्री. रसाळसर, श्री संभाजी पाटील जळगांव, श्री. सय्यद जाकीर, श्री. राजेंद्र जाधव ,श्री. इंगळे सर. श्री.प्रकाश हरणे सर,श्री विनोद पाचडे सर,श्री दिनेश धोटे सर,श्री राहत सर, श्री. बद्रीनाथ शिंदे ,, प्रभूदास पाटील, ईश्वर महाजन अमळनेर यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली.
