कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी साठी खासदार सुनील तटकरे साहेब, आमदार अनिकेत तटकरे आणि नामदार अदितीताई तटकरे यांच्या फंडातून दोन कोटी रुपये
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) संपूर्ण भारत देशासह राज्यात कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या निर्मूलनासाठी देशातील सर्व मंत्री महोदय, आमदार, खासदार आणि सर्व सामाजिक व धार्मिक संघटना आणि देवस्थानाच्या ट्रस्ट या सर्वांनी आपापल्या परीने सढळ हस्ते आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
देशासह राज्यातील कोरोना व्हायरसच्या या संक्रमणकारी संवेदनशील पार्श्वभूमीवर रायगड रत्नागिरी तथा संपूर्ण कोकणचे भाग्यविधाते, राज्य मंत्री मंडळातील अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री पदाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळून महाराष्ट्र राज्याच्या आणि एकूणच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे भरीव कार्य करणारे तत्कालीन कार्यक्षम अर्थ व नियोजन मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जलसंपदा मंत्री इत्यादी अतिमहत्त्वाच्या खात्यांना आपल्या बुद्धी चातुर्याने उचीत न्याय देणारे लोकप्रिय मंत्री आणि आत्ताचे मुत्सद्दी विधानसभा सदस्य लोकप्रिय खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्य स्थितीतीवर वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून मात करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचे घोषित केले आहे.
सदर दोन कोटीच्या आर्थिक निधीचे स्वरूप खासदार श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपये आणि आमदार श्री. अनिकेतजी तटकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा नामदार अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून प्रतेकी ५० लाख रुपये असे एकूण २ कोटी रुपये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हॅन्टीलेटर्स आणि आयसोलेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
कोरोना व्हायरसच्या रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील महाभयंकर संक्रमणशील परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकप्रिय खासदार समग्र कोकणचे भाग्यविधाते माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचे निवारण करण्यासाठी प्राप्त झाल्याने खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या राजनैतिक आणि सामाजिक उत्तरदायित्त्वाचा प्रत्यय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला आला आहे.
