*लोण खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने लोण खुर्द येथे कोरोना-19च्या अनुषंगाने गावात सोडीयम हायपोक्लोराईड या द्रावणाची फवारणी...!*
*घराबाहेर न पडण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन...!!*
*अमळनेर-लोण खुर्द ता अमळनेर येथे कोरोणा तसेच ईतर साथिच्या रोगांवर उपाययोजना म्हणुन ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुक फवारणी करण्यात आली.यावेळी संपूर्ण गावातील घरांच्या आजुबाजुचा परीसर,गटारी,स्वच्छतागृह,प्राण्यांचे गोठे,उकीर्डे,ग्रा पं कार्यालय,मंदिर तसेच सार्वजनिक ठिकानी फवारणी करण्यात आली, गावकर्यांनी विशेषता बाहेरुन आलेले होम क्वारंटाईन लोकांना घरातुन बाहेर न पडण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.*
*यावेळी सरपंच सौ.संगीता अशोक पाटील ग्रा.प.सदस्य श्री. परमेश्वर रामदास पाटील श्री नाना पौलद पाटील श्री अशोक भबुता पाटील सौ सुमनबाई शिवाजी भिल श्री प्रकाश बाजीराव पाटील ,सामाजिक कार्यकर्ता श्री. भगवान आबा,सचिन शिंदे निरंक पाटील ग्रामसेवक योगिता वसंतराव पाटील, आशा स्वयंसेविका सौ.आश्विनी भिल ग्रा.प.कर्मचारी श्री. अशोक साहेबराव पाटील श्री गंगाराम तात्या पोलिस पाटील उदय निंबा पाटील उपस्थित होते.*

