कासोदा तालुका एरंडोल (नूरुद्दीन मुल्लाजी) येथील नामदार शहा फाउंडेशन तर्फे सय्यद मोहल्ल्यातील गरीब विधवा महिला निराधार अपंग या गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले सध्या लॉक डाऊन सुरू असल्याने गरजूंना मदत करणे गरजेचे आहे समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून नामदार शाह फाउंडेशन तर्फे वाटप करण्यात आले व गावातील प्रत्येक मोहल्ल्यात असा कार्यक्रम राबवावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुनेद सय्यद जावेद खान वसीम शेख मोइन अली सद्दाम अली यांनी परिश्रम घेतले
