Halloween party ideas 2015


*एक कुशल संघटक,*
*समर्पित नेतृत्व आबासाहेब विलासराव नेरकर.*

एखाद्या व्यक्तीच्या ठायी सत्य, पवित्र आणि निस्वार्थीपणा ह्या तीन गोष्टी असतील तर समग्र विश्व जरी विरोध करण्यासाठी पुढे ठाकले तरी त्याला ती व्यक्ती तोंड देऊ शकते या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अनुकरण करीत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणारे आबासो. श्री विलास नेरकर हे एक आहेत.

आबांचा जन्म १ एप्रिल १९७१ रोजी चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथे झाला. घरची परिस्थिती गरिबीची. त्यांचे वडील व्यवसायाने शिक्षक असल्याने वडिलांची छाया आबांवर पडली. संघटन कौशल्य, वाक्चातुर्य, पारदर्शी व्यक्तिमत्व, सतत कार्य करण्याचा ध्यास, सर्वसामान्यांच्या दु:खात समरस होणे आणि प्रचंड आत्मविश्वास या गुणांनी त्यांनी सर्वच थरातील जनमाणसांना आपलेसे करुन घेतले आहे.

विविध क्षेत्रात नेत्रदिपक कार्य करुन आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. त्यामुळे सतत कार्यकर्त्यांचे मॊहॊळ त्यांच्याभॊवती असते. आबांनी शिक्षकी पेशातुन केलेले कार्य शिक्षकांना प्रेरणा देणारे आहे. प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी प्रसंगी मंत्री, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी, तसेच मंत्रालयापर्यंत देखील जाण्याची धमक आबांमध्ये आहे. विलासराव नेरकर हे मनमिळाऊ नेतृत्व म्हणुन उत्तर महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. त्यांचे सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील काम कार्य कौतुकास्पद आहे.

विलास नेरकर स्वतः शिक्षक असल्याने सर्वप्रथम त्यांचा शिक्षक नेते अप्पासाहेब हणमंतराव पवार यांचेशी संपर्क आला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघावर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ग. स. सॊसायटीमध्ये संचालक व अध्यक्ष पदाच्या काळात व प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणुन सभासद व शिक्षक हिताचे निर्णय घेतले.

आबासाहेब यापुढे जे कार्य हाती घेतील ते यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी परमेश्वर त्यांना दिर्घाआयुरारॊग्य व शक्ती देवॊ ही आबांच्या वाढदिवसानिमित्त आई जिजाऊंच्या चरणी प्रार्थना.

*शब्दांकन :* ✍🏻
श्री अनिल फुलचंद पाटील [ संचालक ]
ज. जि. प्राथ. शिक्षकांची सह. पत. मर्या. जळगाव
मोबाईल : ९४०३८ १४६७७

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.