Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
पंधरा एप्रिल पर्यंत सर्व परीक्षा आटोपणे शक्य नसल्याने 9 वी व 11 वी च्या विद्यार्थ्यांना सरळ पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा आणि 10 वी च्या भूगोलाच्या पेपर रद्द करून इतर विषयांच्या सरासरी प्रमाणे गुण देण्यात यावेत अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे
कोविड 19 आजारच्या सतत वाढत जाणाऱ्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉक डाऊन केले आहे सर्वत्र बंद असल्यामुळे शिक्षण विभागाने यापूर्वीच 1 ली ते 8 वी च्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्याना पास करण्याचे आदेश दिले आहेत 1ली ते 12 वी च्या परीक्षा 15 एप्रिल च्या आत होत असतात मात्र लॉक डाऊन मुले शक्य नसल्यामुळे 9 वी व 11 च्या परीक्षा देखील रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश द्यावा तसेच 10 वी च्या भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला आहे पुढील वर्षाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भूगोलाचा पेपर रद्द करून इतर विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात यावा अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.