*खेडी ,अमळनेर* (प्र.ज.) जनसुराज्य ग्रामविकास मंडळ खेडी प्र ज ता.अमळनेर येथील पदाधिकारी यांनी जनतेला शेकडो मास्क वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली
अल्पावधीतच नावारूपाला आलेली खेडी(प्र ज) येथील जनसुराज्य ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी गावातील कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी मंडळाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनतेला शेकडो मास्कचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासून जनजागृती केली
मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानदेव पाटील व पदाधिकारी यांनी चौकाचौकात मास्क वाटप करून समाजजागृती केली व कोरोना विषयी समज-गैरसमज,काय करावे, काय करू नये, याविषयी सविस्तर माहिती दिली
या मास्क वाटपामूळे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून 'घरीच राहू,सुरक्षित राहू' ही प्रेरणा उदयास आली आहे
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी
पद्माकर पाटील,तानाजी पाटील, नांमदेव पाटील, यशवंत पाटील, सुनील भाऊसाहेब विलास शिंदे,भास्कर शिंदे प्रबोधन पवार, अनिल जिभु, चंद्रकांत शिंदे, रवी नाना गोकुळ आबा,किरण पाटील, चंदू पाटील,विजय पाटील, राजेंद्र तात्या पाटील,अनिल शिरसाठ, किरण चव्हाण, नंदलाल पाटील,सुनील शिरसाठ, दीपक नाईक, राजेश नाईक,व ग्रामस्थांनी व पदाधिकारी यांनी सहकार्य केले
