अमळनेर प्रतिनिधी-महात्मा फुले विचार मंचाची नुकतीच सहविचार सभा उत्साहात पार पडली.अध्यक्षस्थानी महात्मा फुले विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महाजन होते.
अगोदर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आ.शिरीष चौधरी व त्यांच्या नगरसेवकांनी .नगरपालीकेच्या स्विकृत सदस्यपदी निवड झाल्यामुळे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी मंचाचे अध्यक्ष प्रविण महाजन,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जळगांव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,अँड नगराज माळी,भिलालीचे ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी,दिनेश पाटील, कल्पेश पाटील, विवेक सुर्यवंशी, मोहसीन पठाण, विनायक सुर्यवंशी, रविंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांनी सत्कार केला.
सत्काराला उत्तर देतांना अँड सुरेश सोनवणे म्हणाले कि समाज बांधवाकडुन माझा सत्कार झाला. मी महात्मा फुले विचार मंचाचे आभार न मानता ऋणात राहू इच्छितो.नगरपालीकेच्या स्वीकृतसदस्यपदी माझी निवड झाल्यामुळे मी आ.शिरीषदादा चौधरी व मित्रपरीवारांचे आभारी असून मी नागरीकांची प्रामाणिकपणे सेवा करेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अँड नगराज माळी यांनी केले.तर आभार अमोल माळी यांनी मानले.
फोटो
अमळनेर नगरपालीकेच्या स्विकृत नगरसेवक पदी अँड सुरेश सोनवणे यांची निवडीबद्दल सत्कार करतांना प्रविण महाजन,अँड नगराज माळी,अमोल माळी,दिनेश पाटील व मान्यवर
छाया-ईश्वर महाजन अमळनेर