अमळनेर तालुक्याचे नाव जगप्रसिद्ध विदयापिठात चमकले
पियुषवर अभिनंदनाचा वर्षाव
अमळनेर- प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- शैक्षणिक क्षेत्राचे अमळनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर होते.त्यात पियुष शिरूडे याने जगप्रसिद्ध विदयापिठात चमकवल्यामुळे अमळनेरच्या शिरपेचात तुरा रोवला गेला आहे.
अमळनेर शहरातील रहिवासी पियुष प्रकाश शिरुडे याने अमेरिकेतील UIC Illinois of CHICAGO या जगप्रसिद्ध विद्यापीठात मॅकेनिकल या शाखेत एम एस पदवी घेऊन अमळनेर च्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
पियुष याचे प्राथमिक शिक्षण अमळनेरातील भगिनी मंडळ शाळेत,माध्यमिक शिक्षण जी एस हायस्कुल,पॉलिटेक्निक डिप्लोमा गव्हर्नमेंट कॉलेज पुणे व इंजिनिअरिंग चे शिक्षण वाडिया कॉलेज पुणे येथून झाले,तेथुंन एम एस हे उच्चशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील जगप्रसिद्ध शिकागो विद्यापीठात तो दाखल झाला होता,तेथे दोन वर्षे प्रचंड परिश्रम घेऊन हि पदवी त्याने प्राप्त केली.शिकागो येथे नुकत्याच झालेल्या भव्य पदविप्रदान समारंभात त्याला मान्यवरांच्या हस्ते एम एस पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.पियुष हा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. पि. आर .शिरुडे व सुयोग् महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ उज्वला शिरुडे यांचा सुपुत्र आहे.या उज्वल यशाबद्दल पियुष याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.