अमीरखान बरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी
अहिराणी गाण्यांना अमीरखानाकडून दाद
अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर, जि. जळगाव, वॉटर कप स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या गावांमधील कामांच्या पाहणीसाठी अभिनेते आमिर खान यांनी १५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे भेट दिली. याठिकाणी अहिराणी बोली भाषेतील दोन गाण्यांचे चित्रीकरण करण्यात आले.
आमिर खान व त्यांच्या पत्नी किरण राव दोघांचे दत्त मंदिराजवळ आगमन झाल्यानंतर तरुणींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. त्यांनतर गावातील तरुणींनी तयार केलेल्या पाणी फाउंडेशन वरील ‘चैत्र ना महिनामा, जागृत व्हयनाय, जवखेडाना विकास करणाय’ व ‘जुनं सारं विसरूया, जवखेड्याचा विकास करूया’ या गीतांचे मंदिरा समोर चित्रीकरण करण्यात आले. गाव विकासाविषयीच्या गाण्यांना आमिर खान व किरण राव यांनी टाळ््या वाजवून भरभरुन दाद दिली.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, डी. वाय. एस. पी. रफिक शेख, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणी फाउंशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, उज्ज्वला पाटील, युनियन बँकेचे चेअरमन मयूर पाटील, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, पं. स. सभापती वजाबाई भिल उपस्थित होते.