अमळनेर प्रतिनिधी
जळगांव जिल्हा युवा शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा नुकतीच जळगांव येथे झाली ,सभेत जळगाव जिल्हा शा,शि व क्रीडा शिक्षक महासंघ संलग्नित जळगाव जिल्हा युवा शा,शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यात अध्यक्ष पदी डाॕ.रणजित पाटील (जळगांव) ,उपाध्यक्ष पदी श्री.सुनिल वाघ अमळनेर , उपाध्यक्ष पदी प्रा.समीर घोडेस्वार जामनेर ,सचिव पदी प्रा.हरीश शेळके जळगाव , क्रार्याध्यक्ष पदी श्री.सचिन महाजन एंरडोल ,सहसचिवा पदी प्रा.गिरीश पाटील पाचोरा ,प्रा.वसिम बेग जळगांव , खजिनदार श्री.जितेंद्र फिरके यावल , संघटक मेघशाम शिंदे भुसावळ ,डाॕ.सचिन भोसले भडगांव ,डाॕ.कांचन विसपुते जळगांव ,सल्लागार राहुल सांळुके चाळीसगांव , श्री.देविदास महाजन चोपडा , सदस्य युवराज माळी रावेर ,संतोष उगले मुक्ताईनगर ,
संदेश महानुभव धरनगांव ,विजयकुमार चौधरी बोदवड ,विलास पाटील भुसावळ ,संदिप पवार पारोळा ,नितिन पाटील जळगांव यांची निवड कार्यकारीणीत सर्वानुमते करण्यात आली. सभेत जळगाव जिल्हा शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डाॕ.प्रदीप तळवलकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट् राज्य शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सचिव प्रा.राजेश जाधव सर यांच्या उपस्थिती त घेण्यात आली. वरील युवा शा.शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सर्व जिल्ह्याने अभिनंदन केले आहे..