Halloween party ideas 2015

समाजसेवक सुमित पंडित व पुजा पंडित यांना समाजभुषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित

आय जी एम हेल्थ केयर प्रा.लि. यांच्या वतीने समाजसेवक सुमित पंडित व समाजसेविका पुजा पंडित यांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करन्यात आले.या पुरस्काराचे स्वरुप शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र टा्फि ११००० रु रोख रक्कम देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करन्यात आले.
सुमित पंडित व पुजा पंडित यांच्या विविध समाजोपयोगी लोकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांच्या या अनोख्या समाजसेवेचे तरुणांना प्रेरणादायी आहे ते म्हणतात "दुनिया मे आकर कमाया खूप हिरे-मोती मगर कफन मे जेब नही होती" या म्हणीप्रमाणे ते अहोरात्र दीनदुबळ्यांची गोरगरिबांची सेवा करत असतात लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये त्यांनी गोरगरीबांना औषध मेडिकल जेवण आर्थिक मदत व बेवारस निराधारांची दाढी-कटिंग करून रुग्णालयात नेणे सैनिकांसाठी चांदीचा वस्ताऱ्याने मोफत सलुन सेवा,बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सलून सेवा मोफत सलून मध्ये वाचनालयाची अनोखी सेवा अशा कितीतरी सेवा कार्यांमध्ये अग्रेसर आहेत त्यांनी नुकताच कितीतरी बेवारस मनोरुग्णांना येरवडा पुणे येथे आपल्या हक्काची जागा मिळवून दिली आहे. ह्या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत आय जी एम हेल्थ केयर प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक गोपाळ बोचरे यानी सुमित यांच्या कार्याची दखल घेवून आज छोटेखानी औरंगाबाद जी एस टि भवन कार्यालयाजवर आय जी एम हेल्थ केयर औरंगाबाद च्या कार्यालयात पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला
या पुरस्कारामुळे समाजात सुमित व पुजा त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित चा हा ५४ वा पुरस्कार आहे.तर पुजा हिचा १५ वा पुरस्कार आहे,या आधी त्यांना विविध ६८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गोपाळ बोचरे व्यवस्थापकीय संचालक,अशोक सोळंके संचालक,शेखर बारहाते संचालक,केशव बोचरे- दिग्दर्शक
शेखर बरहाते,शिवाजी बांगर, महेश सोळंके,सुबोध सोमवंशी, शार्दूल देशमुख,माणुसकी समुहाचे उमाकांत वैद्य,सुमित पंडित,पुजा पंडित, आदिनीं परीश्रम घेतले.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.