माहिती अधिकार कायद्यास हुलकावणी देणा-या मुख्यध्यापक बोराडेंना दणका
नाशिक विशेष प्रतिनिधी
माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय -पालखेड या.दिंडोरी जिल्हा नाशिक यांना दिनांक ८-७-२०१६ नुसार अक्षरे करून शाळेच्या प्रशासकीय माहिती मागितली असता येथिल मुख्याध्यापक श्री बोराडे यांनी माहिती मुदतीत दिली नाही म्हणून..व प्रथम अपील अधिकारी माध्यमिक शिक्षणाधीकारी नाशिक यांनी प्रथम अपील सुनावणी घेऊन मुख्याध्यापक पालखेड माध्यमिक विद्यालय यांना माहिती देण्याचे आदेश देऊनही माहिती दिली नाही.. नंतर राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक येथे द्धितीय अपील दाखल केले असता सदर सुनावणी झाली त्यात माहिती अधिकारी मुख्याध्यापक गैरहजर राहिले व आयुक्त यांनी तत्कालीन माहिती अधिकारी मुख्याध्यापक पालखेड माध्यमिक विद्यालय यांना लेखी खुलासा दिनांक -६-१२-२०१८/दि-६-६-२०१९/ ५-९-२०१९/५-१०-२०१९ व शास्त्री बाबतीत खुलासा पत्र्याच्या दिनांक -२०१२-२०१८/२८-६-२०१९/२०-९-२०१९/२२-११-२०१९ व द्धारे ०९-१-२०२०रोजी उपस्थित राहून खुलासा सादर करण्यास सांगूनही उपस्थित राहीले नाहीत व खुलासाही दिला नाही म्हणून कलम ७(१) च्या तरतुदीचे उल्लंघन केले आहे..व माहिती पुरवण्यासाठी हेतूपुरस्सर टाळाटाळ केली आहे व त्यानुसार त्यांचेवर अधिनियम कलम २०(१) नुसार शास्तीची कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे असे नोंदवून आदेश पारित केला व प्रथम अपील अधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक यांना दोन समान मासिक हप्ता मध्ये कपात करून २५०००/- हजार रुपये दंड रक्कम भरणा "००७०,इतर प्रशासकीय सेवा,६० इतर सेवा,८००,इतर जमा रकमा ,(१८) माहिती अधिकार (००७७-०१६-१)" या लेखाशीर्षाखाली जमा करण्याची कार्यवाही करावी व सदर कार्यवाही झाल्यानंतर त्याबाबत आयोगास अवगत करण्याचे आदेश ठोठावला आहे व तो आदेश नुकताच मिळाला तरी प्रसिद्ध करणेबाबत सहकार्य करावे
========
प्रतिक्रिया
जेणेकरून अशा प्रकारे माहिती नाकारणारे प्रमुख अधिकारी / कर्मचारी यांना जरब बसेल व स्वताच्या पद्धतीने मनमानी कामकाज करणारे अधिकारी/ कर्मचारी हे सुधारतीलअसे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रविण महाजन (नाशिक) यांनी व्यक्त केले



