Halloween party ideas 2015

भारतरत्न ए .पी .जे अब्दुल कलाम व घटस्थापना व नवरात्री उत्सवा निमित्ताने पुणे जिल्ह्यात ग्रीन फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण

पुणे :- दि.१७ ऑक्टोबर २०२० रोजी म्हातोबाची आळंदी येथे भारतरत्न मा.राष्ट्रपती ए.पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जंयती व घटस्थापना व नवरात्री निमित्त ग्रीन फाउंडेशन च्या वतीने आळंदी म्हातोबा येथील डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी डॉ. कलाम यांनी दिलेले योगदान अमूल्य असे आहे. त्यांनी या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पीत केले. डॉ. कलाम यांचे व्यक्तिमत्त्व मुर्तीमंत प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत राष्ट्राच्या विकासाचा विचार होता. त्यांनी आयुष्यभर पुस्तकांवर मोठे प्रेम केले. कसदार आणि दर्जेदार वाचनातून जीवनाला योग्य दिशा देण्याची प्रेरणा मिळते, म्हणून पुस्तकांवर प्रेम करा. त्यांच्याशी मैत्री करा, असे ते सांगत. हा संदेश नव्या पिढीसाठी खूप मोलाचा आहे. तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यावर त्यांचा भर होता. देशातील तरुणांसमोर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श उभा केला. महान शास्त्रज्ञ भारत सुपूत्र डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आळंदी म्हातोबा येथील डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन च्या वतीने वड, पिपंळ, नादुक, बेल, करंज अशा विविध प्रकारचे जंगली वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाउंडेशन सचिव प्रितम पाटील, ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष अमीर सय्यद, लोणी काळभोर शाखा अध्यक्ष अध्यक्ष किरण मगर, बिरूदेव भास्कर, किरण बाचकर , जयेश पवार , स्वप्निल कांबळे, अभिषेक शेंडगे, निखिल चव्हाण, तुषार सुराणा , उपस्थित होते




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.