Halloween party ideas 2015

**वाचनाने-प्रेरणा व झाडांपासून- ऑक्सिजन या संकल्पनेतून बालपण च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली ए. पी. जे.अब्दूल कलाम यांची जयंती**
*चला वाचू या.... स्वतः ला घडवू या.....*
पेन्स सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या संहयोगातून वाचन करू या ते ही निसर्गाच्या सानिध्यात
वाचाल तर वाचाल या संकल्पनेतून
१५ आॅक्टोबर २०२० वाचन प्रेरणा दिन भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती बालपण स्कुल पानोडीच्या विद्यार्थ्यांनी घरी राहून निसर्गाच्या सानिध्यात झाडाखाली वाचन करत वाचन प्रेरणा दिन साजरा केला. वाचन व ऑक्सिजन आज महत्वपूर्ण आहे. आज कोरोणाकाळात ऑक्सिजन ला महत्व आले. स्वच्छ हवा तिही झाडाखाली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचताना, ज्ञान प्राप्त करताना उर्जा प्राप्त होते. निसर्गाच्या सानिध्यात, वाचनाने उर्जा, उत्साह, एकाग्रता,शांत वातावरणात वाचन करताना आणि आज भारताचे महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेत वाचन करत आज वाचन प्रेरणा दिन साजरा केला. आजच्या डिजिटल तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांचे वाचनाचे प्रमाण कमी होत चालले आहे. परंतु भारताचे महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन, भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रेरणा विद्यार्थ्यांना निश्चित प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. बालपणच्या चिमुकल्यांनी आज ऑक्सिजन, सावली, देणाऱ्या व्रक्षाखाली विज्ञानविषयक, तसेच आपल्या अभ्यासक्रमातील, प्रेरणादायी गोष्टी याचे वाचन करत व त्यातून निसर्गाचे महत्व, ऑक्सिजनचे महत्व व
राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेत वाचन प्रेरणा दिन कोरोणामुळे घरी राहून साजरा केला. पेन्स सहयोग फाऊंडेशन या संस्थेने विद्यार्थ्यांस वाचनासाठी १०० विज्ञानविषयक पुस्तके या वाचन प्रेरणादायी भेट दिली.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी बालपणच्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे तसेच शिक्षक वर्ग सौ. नागरे शांता, राजश्री बो-हाडे, बालोटे सुचिता, सीमा आव्हाड, बिडवे अश्विनी, अनाप स्नेहल, जाधव पल्लवी,संत, घोडेकर वंदना या सर्व शिक्षकांचे योगदान लाभले.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.