महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस व असंघटित कामगार काँग्रेसच्या शेतकरी बचाव रॅलीला जिल्हयात ठिकठिकाणी प्रचंड उत्तम प्रतिसाद ; जिल्हाअध्यक्ष शिंदे
/ प्रतिनिधी
केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी विधेयक व कामगार विरोधी विधेयक मंजूर केले आहेत. त्याचा काँग्रेसतर्फे काळे कायदे म्हणून उल्लेख करण्यात येत असून या काळया कायद्यांविरोधात अखिल भारतीय काँग्रेसने तथा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस ने आज(दि.१५) गुरूवारी रोजी महाराष्ट्रात शेतकरी बचाव व्हर्चुअल रॅलीचे आयोजन केले होते. या व्हर्चुअल रॅलीला लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात प्रचंड असा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती अखिल भारतीय असंगठित कामगार कांग्रेस तथा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण संजय उर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी दिली.
या रॅलीत सहभागी होता व्हावे म्हणून जिल्ह्यातील तथा विविध विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी माजी मंत्री तथा सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, वैधकीय शिक्षण तथा सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमितभैय्या विलासराव देशमुख, आ.धिरजभैय्या विलासराव देशमुख, कांग्रेस कमिटीचे लातूर जिल्हाअध्यक्ष तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्यदादा उटगे यांच्या आदेशान्वये एलईडी, एससीडी, एचडी स्क्रीन तसेच प्रोजेक्टर लावण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या तसेच असंघटित कामगारांच्या काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अष्टविनायक कॉलनी व अतनूर येथे महाराष्ट्र प्रदेश असंघटित काँग्रेस लातूर जिल्हा ग्रामीण जिल्हाअध्यक्ष संजय उर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसच्या विविध पदधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
सोशल मीडियावर ही रॕली पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. आजच्या शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यातील विविध ठिकाणी घेण्यात आला. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटरनेट कनेक्ट होते. काँग्रेसने गुरुवारी राज्यात एकाच वेळी दहा हजार गावातील शेतकऱ्यांची शेतकरी बचाव रॅलीद्वारे संवाद साधला. यावेळी कांग्रेस प्रदेशअध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस शेतकऱ्यांसाठी तर भाजप धंद्यासाठी आहे बाजार समित्या बंद पाडण्याचा केंद्राचा डाव असून त्याचे दूरगामी वाईट परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. नवीन कृषी कायद्याविरोधात काँग्रेस राज्यात एक कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी जमा करून राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व खा.राहुल गांधी यांच्या माध्यमातून त्या राष्ट्रपती पर्यंत पोहोचणार आहे.असेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी इंटरनेट कनेक्ट रॕलीला उपस्थितीत राहिलेल्याना संबोधित करताना बोलत होते. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमितभैया विलासराव देशमुख म्हणाले की, चीनने भारतीय भूभाग बळकावला असताना भारत कोरोना संकटात असताना केंद्राने घाईघाईने कृषी कायदे केले. चर्चा न करता हे कायदे मंजूर केल्याने संसदेच्या इतिहासात हा काळा दिवस मानला जाईल. शेतकरी विरोधी कृषी कायदे निरस्त करण्यासाठी राज्य सरकारने पंजाब प्रमाणे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ही त्यांनी केली. ते औरंगाबाद येथून मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयक संसदेत मंजूर केली या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण पूर्ण उद्ध्वस्त होणार आहेत. शेतकरी शेतमजुरांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यातूनच राज्य शासनाने ही विधेयके राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील व ग्रामीण जिल्हा कॉंग्रेसतर्फे वेगवेगळ्या व मुख्य ठिकाणाहून काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, महाराष्ट्र कांग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कांग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीयशिक्षण मंत्री अमितभैय्या विलासराव देशमुख, आ.धीरजभैया देशमुख, महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेस प्रदेशअध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल्यदादा उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात व सहा विधानसभा क्षेत्रात व्हर्चुअल रॕलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.
यावेळी कॉंग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी व्हर्चुअल रॕलीला इंटरनेट कनेक्ट व्दारा संवाद साधला. अष्टविनायक नगर कॉलनीतील पटांगणावर दुपारी ४ वाजता व्हर्चुअल रॕली इंटरनेट कनेक्ट मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय असंगठित कामगार कांग्रेस व महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेसचे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय उर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे हे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे लातूर कांग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष श्रीशैल्यदादा उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित होते. यावेळी असंघटित कामगार कांग्रेसचे पदधिकारी, शेतकरी, कांग्रेसचे कार्यकर्ते, महिला, पुरूष, युवक, असंगठित कामगार, बांधकाम व इमारत बांधकाम मजूरदार, मिस्त्री कामगार, वीट्टभट्टी मजूर कामगार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. हा कार्यक्रम कांग्रेस व असंगठित कामगार कांग्रेस यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

