देवगांव देवळी हायस्कुलमध्ये
संत गाडगेबाबा स्मृतीदिनानिमित्त अभिवादन.
अमळनेर प्रतिनिधी -देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले स्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांचा स्मृती दिवसनिमित्तानेअभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. तर प्रमुख अतिथी अरविंद सोनटक्के ईश्वर महाजन ,एस.के.महाजन
एच.ओ.माळी होते. अगोदर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले. संत गाडगेबाबा यांचे कार्य समाजासाठी देशासाठी प्रेरणादायक आहे त्यांनी स्वच्छतेचा मंत्र देऊन जनजागृती केली त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्ताने आज शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के , एच.ओ. माळी यांनी सांगितले यांनी सांगितले चेस प्रकल्पांतर्गत तज्ञ मार्गदर्शक म्हणून शाळेचे इंग्रजीचे शिक्षक एच.ओ.माळी यांची निवड झाल्यामुळे व प्रशिक्षण पुर्ण करून आल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केला. मुख्याध्यापक महाजन म्हणाले की एका ग्रामीण भागातून शिक्षकाची राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्ये निवड होणे शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.