देवगाव देवळी हायस्कुलमध्ये
आरोग्य तपासणी
अंमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आर .बी .एस .के( राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम)
अंतर्गत शालेय आरोग्य तपासणी मुलांना वैयक्तिक स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले किशोरवयीन मुलींच्या समस्या जाणून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घ्यावी, वेळेवर जेवण करावे,योगासने करावीत असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वृषाली पवार अमळनेर यांनी केले. यावेळेस आठवी ,नववी, दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ वृषाली पवार यांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के,
आय आर महाजन , एस के महाजन, एच. ओ.माळी यांनी प्रयत्न केले.
फोटो