*नोकरीचा अट्टहास सोडा--* *प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम मालकर*
*माळी समाज मेळाव्यात ३८९ वधुवरांनी दिला परिचय*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सर्वत्र विवाहविषयक निर्णय घेतांना वधू परिवाराकडून नोकरीकदार वर मिळावा अशी अपेक्षा असते. मात्र समाजात शिक्षणाची पत जरी सुधारली असली तरी प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेलच याची शाश्वती नसल्यामुळे नोकरीचा अट्टाहास न करता शेतकर्यांच्या मुलांचाही विचार करावा, असा सल्ला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी दिला.
येथील लाठी शाळेत रविवारी माळी महासंघातर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास विवाहेच्छूक 389 मुलां-मुलींनी परिचय करुन दिला. मेळाव्यास राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दोन विवाह जुळण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आयोजनकांनी म्हटले आहे.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दलितमित्र माधवराव हुडेकर तर प्रमुख पाहुणे दिलीप देवरे यांच्यासह डॉ. नलिन महाजन, देविदास महाजन, ज्ञानेश्वर महाजन, माजी महसूलमंत्री गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ, आत्माराम माळी, नाना महाजन, प्रा.उत्तम पवार, प्रकाश महाजन, वसंत पाटील, मुरलीधर महाजन, भिमराव महाजन, राजेंद्र महाजन, सोमनाथ महाजन, गोपाळ बाविस्कर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीस मान्यवरांच्या दीपप्रज्ज्वलन करुन महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, संत सावता माळी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. यानंतर वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर विवाहेच्छूक मुलां-मुलींनी परिचय करु दिला.
देविदास महाजन म्हणाले की, तरुणांनी स्वयंरोगजाराला प्राधान्य देवून सक्षम व्हावे. वेळप्रसंगी समाजासाठी अनेक संघटनांनी एकत्र येवून काम करायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
नगरसेविका सरीता नेरकर मनोगतात सांगितले की, घरातील स्त्रिला समाजात जावू द्या. समाज हे हक्काचे घर आहे. त्याठिकाणी तिला आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माजी मंत्री पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक करुन उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील, धनराज माळी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले. आभार प्रा. नितीन चव्हाण यांनी मानले.
यशस्वितेसाठी भास्कर पाटील, कृष्णा माळी, प्रभाकर जाधव, रवींद्र जाधव, संजीव माळी, संतोष महाजन, दिलीप माळी, भागवत बोंबटकर, विनोद पाटील, दिनकर माळी, ज्ञानेश्वर माळी, हनुमंत महाजन, राजेंद्र महाजन, हिरालाल पाटील, नितीन चव्हाण, दिनेश माळी, वना महाजन, गोपाल बाविस्कर, राजेंद्र महाजन, नलीन महाजन, बाबुलाल माळी, श्याम पाटील, प्रदीप महाजन, दगडू माळी, गोकुळ रोकडे, प्रशांत महाजन, सतीश महाजन, चिंधू मोकळ, राजेंद्र महाजन, अभिलाषा रोकडे, शीतल पाटील, नरेश महाजन, सुरेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.
फोटो
-