Halloween party ideas 2015

*महिला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाची शैक्षणिक सहल संपन्न .....* 

अमळनेर प्रतिनिधी

       रुख्मिणिताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालया तील इतिहास विभागा तर्फे आयोजित शैक्षणिक सहल नुकतीच नाशिक येथे संपन्न झाली.नाशिक येथील नाणकशास्त्र वस्तुसंग्रहालय , पांडव लेणी या ऐतिहासिक ठिकाणी विद्यार्थ्यांनीनी सर्व माहिती जाणून घेतली . इतिहास विषयाच्या नानक शास्त्र, पर्यटन, इतिहास लेखनशास्त्र,भारतीय कलेचा इतिहास, इ विषय इतिहास विभागाच्या  अभ्यासक्रमाचा  भाग आहेत.या अनुषंगाने वरील शैक्षणिक सहलीचे आयोजन इतिहास विभाग प्रमुख प्रा जयश्री साळुंके दाभाडे यांनी केले. वरील स्थळांची सखोल  माहिती विद्यार्थीनींना देण्यात आली.

       याशिवाय त्रंबकेश्वर येथे भेट देऊन ह्या हेमाडपंथी मंदिर रचनेची विद्यार्थिनींना देण्यात आली. बौद्ध स्तूप रचना,चैत्य,विहार शिल्पकला,नाण्याची माहिती,सिंधू संस्कृतीचे अवशेष,ताम्रपाषाणयुगीन अवशेष,लोहयुगीन अवशेष ,नाणे पाडण्याच्या पद्धतीच्या प्रतिकृती,मुद्रा,मृदा भांड्यांचे अवशेष,पगड्यांचे प्रकार,संगीत वादयांचे प्रकार,आदिवासी वारली चित्रकला,आदिवासी वाद्य,अशमयुगीन हत्यारे,अवजारे,दागिने,दैनंदिन उपयोगाच्या वस्तू इ विषयी माहिती विद्यार्थिनींना करून देण्यात आली.

अंजनेरी हनुमान, स्वामी समर्थ गुरुपीठ या धार्मिक स्थळांनाही भेट देण्यात आली. दादासाहेब फाळके स्मारक , बुद्ध विहार या ठिकाणांना ही भेट देण्यात आली .इतिहास वारसा याविषया अंतर्गत चित्रपट सृष्टी हा विषय अभ्यासक्रमात असल्याने दादा साहेब फाळके स्मारक त्या दृष्टीने विद्यार्थिनींना अत्यंत महत्वपूर्ण ठरले.चित्रपट निर्मिती, आणि संपूर्ण माहिती यातून त्यांना मिळाली.

या सहलीचे आयोजन इतिहास विभागाच्या प्रमुख प्रा.जयश्री साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली .यावेळी प्रा.सुनील वाघमारे, प्रा.जे.एन .काटे ,रमेश चव्हाण यांनी सहकार्य केले .या सहलीला महाविद्यालयातील 37 विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या .

फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.