Halloween party ideas 2015


मारवड ते अमळनेर रस्त्याच्या कडेने वृक्षारोपणास सामाजिक वनीकरण विभागातर्फे प्रारंभ...

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर :- सामाजिक वनीकरण विभागातर्फे मारवड ते अमळनेर रस्त्याच्या कडेला वृक्षारोपणास मारवड येथे प्रारंभ करण्यात आल
         पत्रकार डॉ विलास पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करून या कामाचा प्रारंभ करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या तर्फे मारवड ते अमळनेर रस्त्याच्या कडेने चार हजार वृक्षारोपणाचा उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वनपाल प्रदीप रामराजे यांनी सांगितले की, "मारवड रस्त्यावर दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करण्यासाठी गावातील बकऱ्या व गुरे चारनाऱ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे." सामजिक वनीकरण विभागाचे वनपाल प्रदीप रामराजे, वनसंरक्षक सतीश ठेलार, विजय विठ्ल पाटील, योगेश आधार पाटील, भूषण साळुंखे, विशाल साळुंखे यांच्यासह गावातील तरुण उपस्थिती होते. उन्हाळ्यात मारवड विकास मंचच्या सदस्यांकडून योगेश साळुंखे यांच्या टँकर द्वारे पाणी देऊन झाडे जगवली जातात. तसेच करणखेडा रस्त्यावर विजय पाटील यांनी सलाईन च्या बाटल्या झाडाजवळ लावून वृक्ष जगवण्यात आली होती. तरी उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी वन विभागाकडून टँकरची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन होईल, अशी मागणी मारवड येथील तरुणांनी केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.