Halloween party ideas 2015


इंदिरा गांधी विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

अमळनेर प्रतिनिधी

 गुरू पोर्णिमा साजरी !!!
 अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत गुरू पोर्णिमेनिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सदर प्रसंगी प्राथमिक शिक्षण इंदिरा गांधी  शाळेत घेतलेली विद्यार्थिनी भाग्यश्री अशोक जाधव  हिच्या हस्ते श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तदनंतर भाग्यश्रीचा वाढदिवसही आजच्या गुरू पोर्णिमेनिमित्ताने आल्यामुळे ' सबसे बडा गुरू ! गुरुसे बडा गुरुका ध्यास ' याप्रमाणें मुख्याध्यापक संदीप पवार  यांनी भाग्यश्रीचा गुरुभेट वस्तू आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तद्नंतर उपक्रम शील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी गुरू आणि शिष्य  महत्त्व पटवून विविध गुरू शिष्य यांची उदाहरणे देऊन विध्यार्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तद्नंतर पी . एम. ठाकरे यांनी गुरूचा महिमा गीतातून सादर केला. त्यानंतर भाग्यश्री जाधव हिने आपल्या मनोगतात शिक्षणामूळे आपले जीवन कसे उज्वल होते हे सर्व उपस्थित विध्यार्यांना पटवून दिले.  सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार, व्ही डी पाटील, पी. ए. शेलकर, ए.पी. जाधव, रविंद्र चौधरी, धर्मेंद्र पाटील, राहुल पाटील,  आदी  उपस्थित होते .  तदनंतर सर्व उपस्थित विध्यार्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले . डी.एस कारले यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.