शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करावा
-भरत शिरसाठ
चाळीसगांव प्रतिनिधी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 हे भारताच्या शैक्षणिक, समाजिक, आर्थिक, राजकीय, व सांस्कृतिक अशा सर्व अंगांमध्ये खूप मोठा बदल घडवून आणणार असून एक शिक्षक म्हणून आपण त्याचा सखोल अभ्यास व चिंतन केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी चाळीसगाव येथील भूषण मंगल कार्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आयोजित केलेल्या चर्चासत्र प्रसंगी केले.
समता शिक्षक परिषद माध्यमिक विभाग चाळीसगाव शाखेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या वतीने जिल्हाभर अशा चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर धोरणावर अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी प्रा.भरत शिरसाठ यांनी केली. ते पुढे म्हणाले की सद्याचा कोठारी कमिशने सुचवललेला १०+२+३ हा आकृतिबंध रद्द करण्यात येत असून नवीन शैक्षणिक धोरणात ५+३+३+४ असा आकृतिबंध समाविष्ट करण्यात आला आहे. अंगणवाडी चे वर्ग प्राथमिक ला जोडणार असून नववी ते बारावी असा माध्यमिक गट असणार आहे. 2030 पर्यंतच एक किंवा दोन वर्षाचे बीएड केलेले उमेदवार पात्र असणार आहेत. यापुढे चार वर्ष असलेले एकात्मिक बीएड मान्य केले जाणार आहे. स्कूल कॉम्प्लेक्स नावाची नवी संकल्पना येत असून यामुळे शिक्षण क्षेत्रात बरीच उलथापालथ होणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक सेवा संरक्षणाच्या अनुषंगाने व समाजातील अनुसूचित जाती-जमाती व वंचित घटकाच्या विद्यार्थ्यांकरीता सकारात्मक तरतुदी नव्याने अंतर्भूत होणे गरजेचे आहे आणि त्याकरिता शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे , ते म्हणाले. आज भारताला सर्वात जास्त गरज असेल तर राष्ट्रीय एकात्मतेची. राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगाने संवैधानिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण तरतुदी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट होणे गरजेचे आहे,असे सुद्धा त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड होते. संघटनेचे राज्य पदाधिकारी राज्य सचिव संतोष गवई, धनराज मोतीराय, सुभाष मस्के, सतीलाल शिरसाट, संघटनेचे विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप, जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष बी एन पाटील, जिल्हा सचिव रणजीत सोनवणे, टी. बी. पांढरे, सोपान भवरे, अजय भामरे, ईश्वर अहीरे, महिला जिल्हाध्यक्षा छाया बैसाणे इत्यादी उपस्थित होते. सदर प्रसंगी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांचा तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री सी.सी.वाणी व माध्यमिक पतपेढी जळगांव चे सचिव मनोहर सुर्यवंशी यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी व श्री मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवीन शैक्षणिक धोरण हे दुरदर्शी जरी असले तरी विद्यार्थ्यावर जीवघेणे प्रयोग करणारे नसावे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेचे प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड यांनी प्रतिपादित केले. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक सदर चर्चासत्रास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी तर सूत्रसंचालन संघटनेचे चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष वाय.टी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
पी, ए जाधव, दिनेश पगार, मिलिंद भालेराव, बाळक्रिष्ण मालपुरे, हेमंत देवरे, जनार्धन सानप, जी.व्ही.बोरसे, सुशील सोनवणे , दिनेश जगताप, मिलिंद जावळे, अफसर खाटीक, शकील खाटीक यासह संपूर्ण चाळीसगाव तालुका कार्यकारिणीने परिश्रम घेतले.